Mumbai Dabbawala Case Study

Mumbai Dabbawala Case Study

Since 1890, Dressed in white outfit and traditional Gandhi Cap of 5,000 Dabbawalas fulfilling the hunger of almost 240,000 Mumbai Peoples with home-cooked food that is lug between home and office daily. For more than a century our team have been part of this grime-ridden metropolis-of-dreams.

मुंबईचे डबेवाले ....".डबा संस्कृतीची" कीर्ती सातासमुद्रापार .......

प्रिन्स चार्ल्स यांनी जेव्हा मुंबईला भेट दिली तेव्हा तेथील अनोखी डबा संस्कृती पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर जेव्हा कॅमेला पार्कर बोल्स यांच्याशी चार्ल्स यांचे शुभमंगल पक्के झाले तेव्हा त्यांनी या डबेवाल्यांना खास आमंत्रण दिले होते. डबेवाल्यांनीदेखील त्यांच्या या प्रेमळ विनंतीला मान देऊन त्यांना मराठमोळी भेट पाठवून दिली होती हे वाचकांना आठवत असेलच..

कोणालाही खूष करण्याचा मार्ग पोटातून जातो, असे म्हटले जाते. मुंबईतील डबेवाले तर त्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनोख्या "नेटवर्क'ने आता अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूललादेखील भुरळ पाडली असून त्यामुळे या डबा संस्कृतीची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे.

रोज हे पाच हजार डबेवाले मुंबानगरीत तब्बल दोन लाख जेवणाच्या डब्यांचे वितरण कसे करतात, त्यांच्याकडून डबे देताना आणि जमा करताना एकही चूक कशी होत नाही, मुंबईसारख्या इतक्या दाट लोकवस्तीच्या महानगरात या मंडळींनी हा चमत्कार वर्षानुवर्षे कसा करून दाखवला, याचे कौतुकमिश्रित कोडे हार्वर्ड स्कूलमधील तज्ज्ञांनाही सुटलेले नाही. त्यांनी या डबेवाल्यांवर खास अहवाल तयार केला असून त्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे.

डबे संस्कृतीतील बारकावे . मानवी बळाचा खुबीने वापर करून ही एवढी मोठी कामगिरी एकही चूक किंवा त्रुटी न राहता बिनबोभाट पार पाडली जाते हार्वर्डने या अहवालाची जगभरातील विविध संस्थांना विक्री करण्याचे ठरवले आहे अमेरिकेतील अनेक औषध कंपन्यांनी भारतीय आयुर्वेदाचा तपशीलवार अभ्यास करून उच्च दर्जाची औषधनिर्मिती केली आहे. त्यातून ते कोट्यवधी डॉलर्स कमावत आहेत. आता हार्वर्ड स्कूलवाल्यांनी या डबेवाल्यांच्या कार्यसंस्कृतीतून डॉलर्स जमा करायचे ठरवले आहे.डबेवाल्यांची कीर्ती यानिमित्ताने सातासमुद्रापार पोहोचली हे काय कमी झाले..

Refrences : https://www.facebook.com/santoshd.patil.961

 

About the Author

srajsolutions