Joshi Wadewale Pune Story in Marathi

Joshi Wadewale Pune Story in Marathi

गजरे फटाके विकणारा ..आज १८ हॉटेलचा मालक

जोशी वडेवाले (एका वडापाववाल्याची स्टोरी).

व्यवसायाला ...सदगुरू वामनराव पै यांच्या.. आध्यात्मिक जोड

गजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारा शैलेश आज १८ हॉटेलचा मालक झालाय. दुसऱ्यांची गाडी धुऊन महिन्याला वीस रुपये कमावणारा शैलेश आज सात गाडय़ांचा मालक झालाय.

ते तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हे तत्त्व मनाशी बाळगत
शैलेशची आर्थिक परिस्थिती फारच कठीण होती. वडील एकटेच कमावणारे, त्यामुळे त्याचं लहानपण कष्टातच गेलं होतं. त्याला कष्टाची सवयच होती. अगदी आठवी-नववीत असताना तो आणि त्याचा भाऊ माउली (जोशी) बसस्टॉपवर काकडी आणि गजरे विकून पैसे मिळवत असे. प्रत्येक दिवाळी इतर मुलांसाठी आनंदाची असे, पण त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी पैसे मिळवणे हाच उद्देश असे. तो दिवाळीत फटाके विकायचा आणि सोबत किल्ल्यावरील पोस्टकार्डची घरे तयार करून ती पाच-पाच पैशांना विकायचा. पण खेळ त्याचा आवडीचा. शाळेत असताना तो प्रत्येक खेळात भाग घ्यायचा आणि जिंकायचा. त्यातूनच त्याला ज्यूदोचे वेड लागले त्यानेच त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण दिले.

शाळा तर अशी कष्ट करतच गेली, पण पुढचं शिक्षण घेता यावं, कॉलेजमध्ये जाता यावं म्हणून तो रोज सकाळी साडेपाच ते साडेाठ या वेळात गाडय़ा धुण्याचे कामही करायचा. एक गाडी महिनाभर धुतल्यानंतर त्याला त्याचे वीस रुपये मिळायचे. जास्त पैसे मिळावेत म्हणून तो सात सात, कधी जास्त गाडय़ाही धुवायचा. पण तेव्हापासून त्याने आपल्याकडेही गाडी असणारच हे स्वप्न पाहिलं होतं. ते सत्यात आणण्यासाठी तो जिवापाड मेहनत घेत होता.

पुण्याच्या सारसबाग येथे भरलेल्या डिस्नेलँडमध्ये खाद्यपदार्थाचा स्टॉल टाकला. त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की खाद्यपदार्थाचंच दुकान सुरू करायचं ठरवलं.पूर्वीच्या झेरॉक्सच्या दुकानाशेजारीच ‘विकीज स्नॅक्स सेंटर’ नावाने एक छोटंसं हॉटेल सुरू केलं. काही दिवस सारसबागेत खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला. स्वारगेटजवळ डोशाची गाडी चालवली; पण या स्नॅक्स सेंटरच्या कारभारात म्हणावा तसा जम बसत नव्हता. तेव्हाच डोक्यात वडापावचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. याला शैलेशचा विरोध होता, पण तरीही २ ऑक्टोबर १९८९ ला विकीज स्नॅक्स सेंटरच्या जागी ‘जोशी वडेवाले’ नावाने वडापावविक्रीचा श्रीगणेशा केला, आणि अक्षरश: पहिल्या दिवसापासूनच या उद्योगाला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. चविष्ट गरमागरम वडापाव, स्वच्छता, ग्राहकांना आपलंसं करण्याची वृत्ती व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर आम्ही लवकरच पुणेकरांची मनं जिंकली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणपतीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी ‘जोशी वडेवाले’ हे क्षणभर विश्रांतीचं ठिकाण बनलं. आमच्या इतर शाखाही सुरू झाल्या. जसजशी प्रगती होत गेली तसं आम्ही स्वत:चं घर, पहिली गाडी घेतली.एक काळ असा होता जेव्हा शैलेश कुणीच नव्हता. फक्त आणि फक्त कष्टच त्याच्या नशिबी होते.

गजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारा शैलेश आज १८ हॉटेलांचा मालक झालाय. दुसऱ्यांची गाडी धुऊन महिन्याला वीस रुपये कमावणारा शैलेश आज सात गाडय़ांचा मालक झालाय. आणखी काय हवं असतं माणसाला जगायला?

Refrences: https://www.facebook.com/santoshd.patil.961/posts/10210435640749726?pnref=story

About the Author

srajsolutions