व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बिझनेस, इंजिनिअर तरुणांनं लढवली अनोखी शक्कल

बेळगाव: बेळगावातल्या कुमेल बरफवाला या तरुणानं व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून भाजीपाला आणि फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या कुमेलनं अवघ्या चार महिन्यांत या व्यवसायात चांगलंच बस्तान बसवलं आहे.

व्हॉटस्अॅपवरुन ताजी भाजी घरपोच मिळत असल्यानं ज्येष्ठ नागरिक, तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना हा उपक्रम फायदेशीर ठरतो आहे.

कुमेल बरफवाला या मेकॅनिकल इंजिनियर असणाऱ्या तरुणाने व्हाटसअॅपच्या माध्यमातून भाजी आणि फळे विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.

कुमेलच्या कुटुंबाचा वडिलोपार्जित व्यवसाय कोल्ड स्टोरेजचा आणि तो पेशानं इंजिनियर. पण त्याने सोशल मीडियाचा खुबीनं वापर करून भाजी आणि फळं विक्रीचा व्यवसाय सुरु केला. व्हाटसअॅप त्याने कॉम्प्युटरला जोडलं असून त्या व्हाटसअॅप क्रमांकावर ग्राहक आपल्याला आवश्यक असलेल्या भाजीची ऑर्डर देतात.

ऑर्डर आल्यावर त्याप्रमाणे भाजी एका ट्रेमध्ये भरली जाते आणि नंतर भाजी ग्राहकाला घरपोच केली जाते. बाजारातल्या भाजी इतकाच त्याचा दर असून ग्राहकाला ताजी आणि घरपोच भाजी मिळते. ताजी भाजी आणि फळं ग्राहकांना घरपोच दिल्यानं चार महिन्याच्या काळातच कुमेलने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

About the Author

srajsolutions